शनिवार, १ जानेवारी, २०११

कविता



ट्रेन मध्ये रोज रोज सगळयांनी यायचं असतं,


काहीनी बसायचं असतं, काहीनी उभं रहायचं असतं,


थोड्या थोड्या वेळाने खुपसं भांडायचं असतं,


भांडणात एकमेकांच घराणं काढायचं असतं,


जमलच नाही तर मनातल्या मनात चिडायचं असतं,


इथेच संस्काराचं गणित जमवायचं असतं,


इथे प्रत्येकीची एक चौकट असते,


चौकटीत ती एक सुरक्षित असते.


नाही म्हणायला, अनोळखी ती दुर्लक्षितच असते,


तिचे वागणे सगळ्यासाठी विक्षिप्त असते,


सणांचे सुख-सोहाळे इथेच साजरे होत असतातं,


मैत्रीचा आनंद, नात्यांमधला ताण व्यक्त होत असतो.


कुणीतरी कुणाला समजवतं असतं,


नवीन चेहऱ्याची चौकट तयार होत असते,


जुनंपणं सरून नवपणं येत असतं,


तिळगूळ घ्या गोडगोड बोला, असे सांगून


नवेपणं स्विकारायचं असतं


रोजचीचं अशी चालत, असते आपली संक्रांत


तर कधी लुटत असतो, 


सोनं एकेकीच्या घराचं.... घरपणाचं


एकेक थांब्यापर्यत येताना


जायचं गढून गतकाळात


माझं मात्र नाही बाई अस्सं म्हणत,


झुगारायची कातं ट्रेनची अन् चालायचं.....


एकेक पाऊल, एकेक खूणगाठ उकलतं....हे रोजचंच


















मंगळवार, १४ डिसेंबर, २०१०

लिहावेसे वाटले म्हणून

काही समजावते मनाला पण मनाच्या भिंती भेदुन जावे कुठे ते कळेना, अडकले या पाशात, पाश हे तोडू कसे.
शब्दाचे खेळ न्यारे खेळात बुडाले सारे, आपण एक मध्य, बिंदू सारे गळाले, भेटते येथे अपमानाचे एक श्वापद,शोधते मी एक नवी वाट.   

काही समजावते मनाला पण मनाच्या भिंती भेदुन जावे कुठे ते कळेना, अडकले या पाशात, पाश हे तोडू कसे.
शब्दाचे खेळ न्यारे खेळात बुडाले सारे, आपण एक मध्य, बिंदू सारे गळाले, भेटते येथे अपमानाचे एक श्वापद,शोधते मी एक नवी वाट.   

गुरुवार, ९ डिसेंबर, २०१०

कविता

                                                             कधी काळी उमटल्या होत्या,
                                                             या रस्त्यावरती माझ्या पाउलखुणा
                                                      अन् तिथेच विखुरल्या होत्या,
                                                              माझ्या स्वप्नांच्या कळ्या......