ट्रेन मध्ये रोज रोज सगळयांनी यायचं असतं,
काहीनी बसायचं असतं, काहीनी उभं रहायचं असतं,
थोड्या थोड्या वेळाने खुपसं भांडायचं असतं,
भांडणात एकमेकांच घराणं काढायचं असतं,
जमलच नाही तर मनातल्या मनात चिडायचं असतं,
इथेच संस्काराचं गणित जमवायचं असतं,
इथे प्रत्येकीची एक चौकट असते,
चौकटीत ती एक सुरक्षित असते.
नाही म्हणायला, अनोळखी ती दुर्लक्षितच असते,
तिचे वागणे सगळ्यासाठी विक्षिप्त असते,
सणांचे सुख-सोहाळे इथेच साजरे होत असतातं,
मैत्रीचा आनंद, नात्यांमधला ताण व्यक्त होत असतो.
कुणीतरी कुणाला समजवतं असतं,
नवीन चेहऱ्याची चौकट तयार होत असते,
जुनंपणं सरून नवपणं येत असतं,
तिळगूळ घ्या गोडगोड बोला, असे सांगून
नवेपणं स्विकारायचं असतं
रोजचीचं अशी चालत, असते आपली संक्रांत
तर कधी लुटत असतो,
सोनं एकेकीच्या घराचं.... घरपणाचं
एकेक थांब्यापर्यत येताना
जायचं गढून गतकाळात
माझं मात्र नाही बाई अस्सं म्हणत,
झुगारायची कातं ट्रेनची अन् चालायचं.....
एकेक पाऊल, एकेक खूणगाठ उकलतं....हे रोजचंच